उडुपीतील शरीरसौष्ठव स्पर्धेत शहाबुद्दीनने पटकावले १ लाखांचे प्रथम पारितोषिक!

उडुपीतील शरीरसौष्ठव स्पर्धेत शहाबुद्दीनने पटकावले १ लाखांचे प्रथम पारितोषिक!

आर्यन उपविजेता; मेलांगाकी ठरला बेस्ट पोझर; २०० स्पर्धकांचा सहभाग, विजेत्यांना एकूण ४ लाखांची बक्षिसे

बेळगाव : उडुपी जिल्ह्यातील अलांकुर गावात आयर्न टेंपलचे मालक हर्षित गौडा यांच्या पुढाकाराने भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सुमारे २०० शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेत आपले शरीरसौष्ठव कौशल्य सादर केले.

या स्पर्धेत उडुपी येथील शहाबुद्दीन याने उत्कृष्ट शरीरयष्टी आणि सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावत १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि ४ फूट उंचीचा आकर्षक चषक मिळविला. आर्यन याने उपविजेतेपद मिळवत ४० हजार रुपये रोख आणि ३ फूट उंचीचा चषक पटकाविला. तर मेलांगाकी याने बेस्ट पोझरचा किताब मिळवत २० हजार रुपये रोख पारितोषिक आणि चषक मिळविला.

या स्पर्धेत विविध गटांतील विजेत्यांना एकूण ४ लाख रुपयांची रोख बक्षिसे, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचे पंच म्हणून राजेश लोहार, अनिल आंबरोळे, शशिकांत उल्लाळ, भारत बाळेकुंद्री, श्रीधर बारटक्के, बाबू पावशे, रमेश शेट्टी आणि राजेश अल्वा यांनी काम पाहिले. स्टेज मार्शल म्हणून नवीन कुलाल आणि धीरज पुजारी यांनी जबाबदारी सांभाळली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी हर्षित गौडा यांनी विशेष परिश्रम घेतले. शरीरसौष्ठव क्षेत्रातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − sixteen =

error: Content is protected !!