70 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी बेळगावच्या तीन कराटेपटूंची राज्य संघात निवड

70 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी बेळगावच्या तीन कराटेपटूंची राज्य संघात निवड

बेळगाव : 70 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा 2026 साठी बेळगावच्या तीन होतकरू कराटेपटूंची राज्य संघात निवड झाली आहे. आरोही कित्तूरकर, सायली गुंडकल आणि श्रावणी कोलंबस्कर यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ही निवड मिळवली आहे.

राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या स्पर्धेत तिन्ही खेळाडू राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या या निवडीमुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशाबद्दल तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत असून, राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्णपदक मिळवावे, अशा शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen − 9 =

error: Content is protected !!