बेळगाव : बिर्ला इंटरनॅशनल स्कूल, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेच्या रोड रेस प्रकारात दुसऱ्या दिवशी उत्तर विभागातील स्केटर्सनी आघाडी घेतली.
या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उमेश कलघटगी, संतोष दरेकर, ज्योती चिंडक, सूर्यकांत हिंडलगेकर, एकनाथ अक्षिमनी, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर यांच्यासह स्पर्धक स्केटर्स आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेतील पदक विजेते पुढीलप्रमाणे :
- सुवर्णपदक : टी. एस. जास्विक, प्रचीती लगड, युविन राज, मायरा त्यागी, एरिक पॉलसन, औजस्वि, कैवण्या बी. एस., वृद्धी महेश्वरी, शंतनु अग्रवाल, जी. रितेश, श्रीनिति, चेनेय मलिक, साधना एस., आफ्रा फहीद, जडेन जयेश, तारीका, अक्षधा टी., दक्ष भाटी, प्रणव जे., निहारिका टी. आदी.
- रौप्यपदक : आदर्श सिंग, चेस्टा यादव, व्ही. साई यशवंत, कायरा तांडेलकर, देवांश पटेल, नयशा भटनागर, अचिव, श्री रामकुमार, अनिका कार, मोक्षित एन. बी., कामया शर्मा, शौर्या तिवारी, दिशिता शर्मा, दाविका गौडा, साधुरिका एम., पेवा पार्लीन, तनिष, पारस कुशवाह, सुदर्शनी के. एस. आदी.
- कांस्यपदक : आर्यन नंबीर, प्रनवी सिंग, मोहम्मद राहील, प्रतिभा सिंग, राजवीर नायक, पाखी सिंग, मन्या हरनेजा, राघव आर. के., दिबेन पटनाईक, अर्पिता मेहरा, शौर्यवर्धन राजपूत, मेशा दानिश, अद्विक चौधरी, महंम दानिश, वसंतन एस., कायरा सिंग, रोमा यादव, रुठव प्रदीप, लविश, कशिका एस. आदी.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, सोहम हिंडलगेकर, स्वरूप पाटील, शल्य तारळेकर तसेच बिर्ला इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक व कर्मचारी आणि इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
