सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत दक्षिण विभागाची आघाडी; बेळगावच्या आर्या कदमला सुवर्णपदक

सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत दक्षिण विभागाची आघाडी; बेळगावच्या आर्या कदमला सुवर्णपदक

बेळगाव : बिर्ला इंटरनॅशनल स्कूल, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत रिंक रेसच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण विभागीय स्केटर्सनी आघाडी घेतली. या स्पर्धेत बेळगावच्या आर्या कदम हिने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी विविध गटांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. देशभरातून सहभागी झालेल्या स्केटर्सनी आपले कौशल्य आणि वेगाचे प्रदर्शन केले. यामध्ये बेळगावच्या आर्या कदम हिने सुवर्णपदक मिळवत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ज्योती चिंडक यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक डॉ. प्रेमानंद जाधव, रविश राव, आलोक त्रिपाठी, सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर यांच्यासह स्पर्धक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेतील पदक विजेत्यांची यादी :

खेळाडूचे नावपदक
मोरया नाईकसुवर्ण
डोरे श्रीयानरौप्य
शौर्यवर्धन राजपूतकांस्य
सेलिना मॅडिसनसुवर्ण
वाणी जिंदालरौप्य
आकृती शेट्टीकांस्य
आलीत जेम्ससुवर्ण
अद्विक चौधरीरौप्य
विनायक वीकांस्य
धनशिका के. एस.सुवर्ण
आर्याध्या सिंगरौप्य
लूशा महेश्वरीकांस्य
आर्या कदमसुवर्ण
जतिन केशवानीरौप्य
ईश्वरकांस्य
साधना एम.सुवर्ण
कायरा सिंगरौप्य
पी. एम. रक्षिताकांस्य
दक्ष भाटीसुवर्ण
सौरभ साळोखेरौप्य
अंशुमन बघेलकांस्य
जेसीना कोरेरासुवर्ण
जानूशिया एम.रौप्य
एस. सुधाक्षीनाकांस्य
शब्रीवसन पी. बी.सुवर्ण
आयुष भट्टारौप्य
सिद्धार्थ खारोलकांस्य
निहारिका टी.सुवर्ण
काशीका एस.रौप्य
अमरीथा पी.कांस्य

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, सोहम हिंडलगेकर, स्वरूप पाटील, शल्य तारळेकर, बिर्ला इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक व कर्मचारी वर्ग तसेच अनेक जण परिश्रम घेत आहेत.

बेळगावच्या आर्या कदम हिने मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − one =

error: Content is protected !!