उचगाव : उचगाव विभागीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आंबेवाडी येथील भगतसिंग हायस्कूलच्या प्रांगणात उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी अतिवाडकर होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते आर. एम. चौगुले, भाग्यलक्ष्मी सोसायटीचे चेअरमन अनिल अतिवाडकर तसेच संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून एस. डी. पाटील सर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक वाय. एम. पाटील, अमोल पाटील, बी. के. कंग्राळी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूवृत्ती, शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते. विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. उद्घाटन सोहळ्यानंतर स्पर्धांना उत्साहात सुरुवात झाली.
