खानापूर तालुका शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी किरण पाटील यांची निवड

खानापूर तालुका शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी किरण पाटील यांची निवड

बेळगाव : कर्नाटक राज्य माध्यमिक शारीरिक शिक्षक संघटना, बंगळूर यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शारीरिक शिक्षक संघटना, खानापूर तालुक्याच्या अध्यक्षपदी मणतुर्गा हायस्कूलचे शारीरिक शिक्षक किरण आर. पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली.

चन्नेवाडी गावचे सुपुत्र असलेले किरण पाटील यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. तालुका, जिल्हा तसेच राज्यस्तरीय विविध क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी पंच आणि प्रशिक्षक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

निवड प्रक्रियेवेळी खानापूर तालुक्याच्या पीईओ सुरेखा मिर्जी, बेळगाव जिल्हा कार्यदर्शी एल. एन. कुरेर, प्राथमिक शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सी. आर. भोसले, बेळगाव जिल्हा सरकारी ग्रेड-१ अध्यक्ष बैलवाड, उमेश धबाले, एस. बी. अंबरगट्टी, एम. पी. निचनकी, ए. आर. पाटील, सन्नार, पवार, सी. आर. तडकोड तसेच सेवादल संचालक पत्तार उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष किरण पाटील यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मावळते अध्यक्ष तथा सरकारी माध्यमिक शाळा, हिरेमनोळी येथील शारीरिक शिक्षक बी. के. पाटील यांचाही गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातील शारीरिक शिक्षक, सीआरपी तसेच क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − two =

error: Content is protected !!