सलग तीन विजयांसह राजा शिवाजी बेळगावचा सुपर 16 मध्ये दिमाखात प्रवेश; आता गतविजेत्या नम्मा बेंगळुरू भागीरथशी लढत!

सलग तीन विजयांसह राजा शिवाजी बेळगावचा सुपर 16 मध्ये दिमाखात प्रवेश; आता गतविजेत्या नम्मा बेंगळुरू भागीरथशी लढत!

बेळगाव : दमदार फलंदाजी आणि प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर राजा शिवाजी बेळगाव संघाने स्पर्धेत आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. सलग तीन सामने जिंकत संघाने सुपर 16 फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. आता सुपर 16 मध्ये मागील वर्षाच्या KSPL विजेत्या नम्मा बेंगळुरू भागीरथ संघाशी बेळगावच्या संघाची महत्त्वपूर्ण लढत होणार आहे.

स्पर्धेतील 44 व्या सामन्यात राजा शिवाजी बेळगाव आणि मंगळुरू पँथर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून राजा शिवाजी बेळगावने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मंगळुरू पँथर्स संघाला 9 षटकांत 9 गडी गमावून 93 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे राजा शिवाजी बेळगावसमोर विजयासाठी 94 धावांचे लक्ष्य होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना राजा शिवाजी बेळगाव संघाने आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले. अवघ्या 8.1 षटकांत 4 गडी गमावून 95 धावा करत संघाने 6 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे विजयासाठी पाच चेंडू शिल्लक असतानाच संघाने लक्ष्य गाठले.

या विजयासह राजा शिवाजी बेळगावने स्पर्धेत खेळलेले तिन्ही सामने जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले असून सुपर 16 फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे.

सुपर 16 मध्ये रंगणार मोठी लढत!

राजा शिवाजी बेळगाव संघाचा पुढील सामना बुधवार, 18 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 8 वाजता नम्मा बेंगळुरू भागीरथ संघाविरुद्ध होणार आहे. मागील वर्षीच्या KSPL विजेत्या संघाशी होणाऱ्या या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

सलग तीन विजयांमुळे राजा शिवाजी बेळगाव संघाचा आत्मविश्वास उंचावला असून सुपर 16 मधील या महत्त्वपूर्ण लढतीतही संघ विजयाची परंपरा कायम राखणार का, याची उत्सुकता बेळगावच्या क्रिकेटप्रेमींना लागली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 1 =

error: Content is protected !!