खानापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत मणतुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थीनींना सर्वसाधारण विजेतेपद

खानापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत मणतुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थीनींना सर्वसाधारण विजेतेपद

खानापूर : नुकत्याच पार पडलेल्या खानापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित मणतुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थीनींनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. विद्यार्थ्यांनीही विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत अनेक क्रमांक मिळविले.

मुलींच्या गटात देवयानी हेब्बाळकर हिने 100 मीटर, 200 मीटर धावणे व 110 मीटर अडथळा शर्यतीत प्रथम क्रमांक मिळविला. विनया मिसाळ हिने गोळाफेकमध्ये प्रथम व थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. नमिता शिवठणकर हिने गोळाफेकमध्ये द्वितीय, तर विजया मिसाळ हिने भालाफेकमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला.

श्रेया सावंत हिने 3 कि.मी. चालण्यात प्रथम, वर्षा मोरे हिने द्वितीय, विद्या मोरे हिने 800 मीटर धावण्यात प्रथम व 1500 मीटरमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. रोशनी चव्हाण हिने 3000 मीटर धावण्यात प्रथम, तर श्रावणी कदम हिने द्वितीय क्रमांक मिळविला. श्रृतिकक्षा पाटील हिने तिहेरी उडीत प्रथम व लांब उडीत तृतीय क्रमांक मिळविला. अनविता धबाले हिने 400 मीटरमध्ये प्रथम, श्रद्धा गावडा हिने द्वितीय, भारता पाटील हिने 1500 मीटरमध्ये प्रथम, तर अपूर्वाने द्वितीय क्रमांक मिळविला.

मुलींच्या सांघिक प्रकारात 4×100 मीटर रिले व 4×400 मीटर रिलेमध्ये प्रथम, खो-खोमध्ये प्रथम, तर कबड्डी व हॉलीबॉलमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला.

मुलांच्या गटात अभिनंदन देवलतकर याने 100 मीटर धावण्यात प्रथम व 110 मीटर अडथळा शर्यतीत तृतीय क्रमांक मिळविला. मंथन पाटील याने 1500 मीटर धावणे व थाळीफेकमध्ये प्रथम, तसेच गोळाफेकमध्ये तृतीय क्रमांक मिळविला. आदित्य मिसाळ याने 3000 मीटरमध्ये तृतीय, वासुदेव मयेकर याने 1500 मीटरमध्ये द्वितीय, तर महादेव पाटील याने 5 कि.मी. चालण्यात प्रथम क्रमांक मिळविला. समर्थ सुळकर याने 5 कि.मी. चालण्यात द्वितीय क्रमांक मिळविला.

मुलांच्या सांघिक प्रकारात 4×100 मीटर रिले व हॉलीबॉलमध्ये प्रथम, तर खो-खोमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला.

14 वर्षांखालील मुलांच्या गटात देवराज पाटील याने 100 व 200 मीटर धावण्यात प्रथम, तर राम कुलम याने दोन्ही प्रकारांत द्वितीय क्रमांक मिळविला. ज्ञानेश्वर शिवठणकर याने 400 मीटर धावणे, गोळाफेक व थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. श्रीराम गावडा याने 400 मीटरमध्ये तृतीय, साईश सुतार याने 600 मीटरमध्ये प्रथम, तर अथर्व पाटील याने द्वितीय क्रमांक मिळविला. राम कुलम याने गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. या गटातील कबड्डी, हॉलीबॉल आणि 4×100 मीटर रिले संघांनी प्रथम क्रमांक मिळविला.

या उल्लेखनीय यशाबद्दल विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष वाय. एन. मजुकर, सचिव प्रसाद मजुकर, मुख्याध्यापक जे. एम. पाटील, क्रीडा शिक्षक किरण पाटील तसेच सहशिक्षक व कर्मचारी यांचे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five − two =

error: Content is protected !!