खानापूर : बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन व साई स्पोर्ट्स अकॅडमी खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा नुकत्याच मराठा मंडळ खानापूरच्या स्केटिंग रिंकवर उत्साहात पार पडल्या. स्पर्धेला जिल्हाभरातील स्केटर्स आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभासाठी माजी आमदार अरविंद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना मेडल प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी त्यांनी स्केटिंगचे महत्त्व, आरोग्यदायी जीवनशैली तसेच खेळाडूंनी सातत्याने सराव करून प्रगती साधावी, असे मार्गदर्शन केले. तसेच बेळगांवमधील स्केटर्सना प्रोत्साहन देत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी स्केट पार्कचे अशोक गोरे, साई स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रसाद जाधव, राजलक्ष्मी जाधव, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, ऋषिकेश पसारे, सोहम हिंडलगेकर तसेच बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे पदाधिकारी, स्केटर्स व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजेते स्केटर्स पुढीलप्रमाणे :
सूफीयान शहाबादी – १ सुवर्ण, आशिष अंगडीकर – १ रौप्य, हवीश नायडू – १ कांस्य, श्री मांजरेकर – १ सुवर्ण, जीवा होसमनी – १ रौप्य, ऋषिकेश मांजरेकर – १ कांस्य, नवनीत रविकांत – १ सुवर्ण, तीर्थ पाचापूर – १ सुवर्ण, आण्विका कलाल – १ सुवर्ण, ऋत्ववी हेडा – १ रौप्य, आयुष कार्लेकर – १ सुवर्ण, केदार संगळ – १ रौप्य, अंजली ढवळे – १ सुवर्ण, आण्विका काकती – १ रौप्य, ईशान पन्हाळकर – १ सुवर्ण, कुबेर शहापूरकर – १ रौप्य, अथर्व कटगरी – १ कांस्य, प्राणिका मोटेकर – १ सुवर्ण, जितेश बेनाळी – १ सुवर्ण, पूर्विका गुद्देमाली – १ सुवर्ण, तनिष्का जाधव – १ सुवर्ण, समृद्ध बानी – १ सुवर्ण, साबिया शहाबादी – १ सुवर्ण, राशी जाधव – १ सुवर्ण, नंजुनाथ हल्याळ – १ सुवर्ण, नागराज – १ रौप्य, निरोन फर्नांडिस – १ सुवर्ण, धीरेन होसमनी – १ रौप्य, सिद्धी बालेकुंद्री – १ रौप्य, आरव शेट्टी – १ सुवर्ण, विघ्नेश कदम – १ रौप्य, ऋत्विक तुपद – १ कांस्य, सिद्धी बिर्जे – १ सुवर्ण, समर्थ – १ सुवर्ण, श्रीधर गुरव – १ रौप्य, दिव्या बेनाळी – १ सुवर्ण, अयान शिपाई – १ सुवर्ण, ऋषिकेश पाटील – १ रौप्य.
