कुपवाड दुहेरी हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या; समस्त मराठा समाज बेळगावची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

कुपवाड दुहेरी हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या; समस्त मराठा समाज बेळगावची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

मुंबई, दि. 24 ऑगस्ट 2026 : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी समस्त मराठा समाज बेळगावच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन केली.

कुपवाड येथील या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा, अशी भावना समाजातील विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर समस्त मराठा समाज बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन सादर करून आरोपीविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून संबंधित प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन दिल्याची माहिती शिष्टमंडळातील सदस्यांनी दिली.

या शिष्टमंडळामध्ये रमाकांत कोंडुसकर, शरद पाटील, गुणवंत पाटील, सागर पाटील, प्राचार्य आनंद आपटेकर, नंदू इंदलकर, गणेश कदम, कपिल भोसले, विनोद बिर्जे, निलेश मुदगेकर, विराज मुरकुंबी आणि मोतेश बारदेशकर यांचा समावेश होता.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 + three =

error: Content is protected !!