कंगराळगल्लीतील जिजाऊ महिला मंडळातर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कंगराळगल्लीतील जिजाऊ महिला मंडळातर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

बेळगाव : कंगराळगल्ली येथील जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्रीमती अनिता शंभूचे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी गल्लीतील श्री. बाबुराव ओमान्ना कुटरे, श्री. अशोक मिनाजी दरवंदर, श्री. चन्नप्पा सांबरेकर, रेणुका चौगुले, सौ. सरिता कल्लाप्पा कुन्नूरकर, श्रीमती शारदा अनंत वाडेकर आणि कु. दिशा सुहास अडकूरकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यानंतर अनंतराव पाटील, मालोजी अष्टेकर, कुमार सुणगार, आक्‍काताई शंभूचे, डॉ. सांबरेकर आणि अंजना शंभूचे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आक्‍काताई शंभूचे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कंगराळगल्लीचे सरपंच श्री. शंकरराव बडवाणाचे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा चंद्रभागा सांबरेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा सन्मान केला. यावेळी किरण सांबरेकर आणि विक्रम करेगार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती सुतार यांनी केले.

कार्यक्रमास प्रिती पाटील, मिलन बडवाणाचे, गीता देसाई, वनिता मुतगेकर, शीतल पाटील, अनुजा हुरडेकर, विद्या कोकितकर, बालवाडी शिक्षिका व सहाय्यक तसेच गल्लीतील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five + two =

error: Content is protected !!