ओळख पटली नाही, तरी सन्मानाने अंत्यसंस्कार; सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला अनोळखी मृतदेहाला अखेरचा निरोप

ओळख पटली नाही, तरी सन्मानाने अंत्यसंस्कार; सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला अनोळखी मृतदेहाला अखेरचा निरोप

बेळगाव : गेल्या १५ दिवसांपासून सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागृहात ठेवण्यात आलेल्या एका अनोळखी मृतदेहावर सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तसेच नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करूनही कोणीही पुढे न आल्याने बेळगाव सोशल वर्कर रेस्क्यू टीमने पुढाकार घेतला.

या मानवतावादी उपक्रमासाठी अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हूळी, अॅलन विजय मोरे, विकी मेहता, मायकेल पिंटो आणि शंकर लामाणी यांनी पुढाकार घेतला. त्यांनी खडेबाजार पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. यासाठी यल्लप्पा सर यांच्यासह खडेबाजार पोलिसांचे सहकार्य लाभले.

त्यानंतर बेळगाव शहर महानगरपालिकेच्या सहकार्याने अनोळखी मृतदेहावर हिंदवाडी स्मशानभूमीत विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. ओळख नसलेल्या व्यक्तीलाही माणूस म्हणून सन्मानाने अखेरचा निरोप मिळावा, या भावनेतून सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या या सेवाकार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

पोलिस प्रशासन, महानगरपालिका आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या समन्वयातून पार पडलेल्या या उपक्रमाने ‘माणुसकीला ओळखीची गरज नसते’ हा संदेश समाजासमोर ठेवला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three + 13 =

error: Content is protected !!