CEIR पोर्टलच्या मदतीने मार्केट पोलिसांकडून १२३ हरवलेले मोबाईल शोधून परत

CEIR पोर्टलच्या मदतीने मार्केट पोलिसांकडून १२३ हरवलेले मोबाईल शोधून परत

बेळगाव : हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी (CEIR) पोर्टलचा प्रभावी वापर करत बेळगाव शहरातील मार्केट पोलिसांनी तब्बल १२३ मोबाईल फोन शोधून काढले आहेत.

मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे मोबाईल हरवल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी १ जानेवारी २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत CEIR पोर्टलच्या माध्यमातून कारवाई केली.

या मोहिमेत विविध कंपन्यांचे एकूण १२३ मोबाईल शोधण्यात आले. त्यापैकी ७९ मोबाईल यापूर्वीच संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले असून, उर्वरित ४४ मोबाईल २२ ऑगस्ट रोजी त्यांच्या मालकांकडे सुपूर्द करण्यात आले.

ही यशस्वी कारवाई मार्केट पोलीस ठाण्याचे पीआय जे. एम. कालिवर्गी तसेच पोलीस कर्मचारी यल्लप्पा काकनूर आणि विनायक यलिगार यांनी केली.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त तसेच डीसीपी यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 3 =

error: Content is protected !!