ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रात ज्ञान व मनोरंजन कार्यक्रम उत्साहात

ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रात ज्ञान व मनोरंजन कार्यक्रम उत्साहात

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत आयोजित ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटरमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष के. एल. मजूकर, सहकार्यवाह शिवराज पाटील तसेच रविंद्रनाथ जुवळी उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले निवृत्त शिक्षक माधव कुटे यांनी राम गणेश गडकरी यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले. गडकरी यांची नाटके गंभीर स्वरूपाची असली तरी त्यांचे स्फूट लेखन विनोदी आणि भाषाशैली अत्यंत सुंदर असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात स्वाती मोरे यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर डॉ. श्रेयस चौगुले, नारायण कोरडे, पी. एन. रायबागी, रविंद्रनाथ जुवळी, अश्विनी पाटील, विजयमाला पाटील, विजय बांदिवडेकर, सतीश देशपांडे आणि अशोक लोकूर यांनी मराठी, हिंदी व कन्नड गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी मीना कुलकर्णी यांनी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे महत्त्व विशद केले. तसेच दिवंगत विजयसिंह देसाई यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमात के. एल. मजूकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली, तर शिवराज पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − five =

error: Content is protected !!