जयपूरमध्ये ५८ व्या मिस्टर इंडिया २०२६ राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेला सुरुवात

जयपूरमध्ये ५८ व्या मिस्टर इंडिया २०२६ राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेला सुरुवात

जयपूर : प्रतिनिधी

राजस्थानमधील जयपूर येथे ५८ व्या मिस्टर इंडिया २०२६ या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेला सुरुवात झाली आहे. फिट लीग फिटनेस इक्विपमेंट यांच्या वतीने १० आणि ११ ऑक्टोबर रोजी प्रताप नगर येथील निर्मला ऑडिटोरियममध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

इंडियन बॉडीबिल्डिंग फेडरेशन (IBBF) च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील शरीरसौष्ठवपटू सहभागी होत आहेत. स्पर्धेसाठी एकूण १० वजनी गट निश्चित करण्यात आले असून, देशाच्या विविध भागांतून सुमारे ४०० स्पर्धक आपले कौशल्य आणि शारीरिक सौष्ठव सादर करणार आहेत.

राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेमुळे शरीरसौष्ठवपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार असून, शरीरसौष्ठव क्षेत्रातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकता आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − 14 =

error: Content is protected !!