देवचंद कॉलेजजवळील स्मारकास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी केले अभिवादन
निपाणी : महाराष्ट्राचे शिल्पकार, भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्रातील मराठी भाषिकांच्या अस्मितेचे प्रतीक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त २५ नोव्हेंबर रोजी निपाणी येथे अभिवादन करण्यात आले.
निपाणी शहरातील देवचंद कॉलेजजवळ असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी प्रा. राहुल घटेकरी यांनी आपले मनोगत व्यक्त करत यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचे आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीतील त्यांच्या योगदानाचे स्मरण केले.
या अभिवादन कार्यक्रमाला नानासाहेब जामदार, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, विठ्ठल वाघमोडे, कबीर वराळे, सुधाकर माने, अशोक खांडेकर, नंदकुमार राजीगरे, तुकाराम कोळी सर, देवचंद कॉलेजचे डॉ. पंडित शिरगावे, डॉ. एल. पी. लंका, प्रा. राहुल घटेकरी, आर. एम. कोळी, पी. डी. पोवार आणि राम मातीवड्डर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
