लग्नानंतरही प्रियकराशी सुरू होते संबंध; पतीच्या घरातून 21 लाखांचे दागिने चोरून पळालेल्या पत्नीला अटक

लग्नानंतरही प्रियकराशी सुरू होते संबंध; पतीच्या घरातून 21 लाखांचे दागिने चोरून पळालेल्या पत्नीला अटक

बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील होसकोटी गावात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रियकरासोबत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या विवाहित महिलेने पतीच्या घरातून तब्बल 21 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

हसीना नदाफ आणि हणमंत मारापूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 45 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले असून त्यांची किंमत सुमारे 11 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

याप्रकरणी दिलशान नदाफ यांनी कटकोळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 48 तासांत आरोपी प्रियकर-प्रेयसीला ताब्यात घेतले. रामदुर्गचे सीपीआय विनायक बडिगेर आणि पीएसआय बसवराज कोन्नुरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

हसीना ही मूळची मुदलगी तालुक्यातील रहिवासी असून दोन महिन्यांपूर्वीच तिचे होसकोटी गावातील शरीफ याच्याशी लग्न झाले होते. मात्र लग्नानंतरही ती प्रियकराच्या संपर्कात होती. प्रियकरासोबत पळून जाण्याचा कट रचत तिने पतीच्या घरातील 154.6 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरल्याचे तपासात उघड झाले आहे.

सध्या दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून रामदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जलद कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पोलिस पथकाचे कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × five =

error: Content is protected !!