निपाणी : निपाणी नगरपालिकेच्या शेजारी मुख्य रस्त्यावरील मागील दोन महिन्यांपासून गाळाने तुंबलेल्या गटारीची अखेर स्वच्छता करण्यात आली. फोर जे.आर. ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनच्या पाठपुराव्यानंतर नगरपालिका प्रशासनाने या समस्येची दखल घेत जेसीबीच्या साहाय्याने गाळ काढण्याचे काम सुरू केले.

या गटारीवर झाकण नसल्याने परिसरातून ये-जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांसह वृद्ध नागरिकांना धोका निर्माण झाला होता. गटार तुंबल्याने दुर्गंधी तसेच अस्वच्छतेची समस्याही निर्माण झाली होती.
या समस्येबाबत दि. 28 ऑगस्ट 2026 रोजी फोर जे.आर. ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनच्या वतीने निपाणी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. नागरिकांच्या या समस्येची तातडीने दखल घेत दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी जेसीबीच्या साहाय्याने गटारीतील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले.
गटारीची स्वच्छता सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याबद्दल फोर जे.आर. ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनने नगरपालिका प्रशासन तसेच आयुक्त गणपती पाटील यांचे आभार मानले.
संघटनेने आपल्या भूमिकेत स्पष्ट केले की, “श्रेय कोणीही घेऊ दे, जनतेला स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा मिळाल्या पाहिजेत,” हा संघटनेचा प्रमुख उद्देश आहे.
फोर जेआर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन
C.I.N. : U85300KA2022NPL164010
