बेळगाव : टिळकवाडी वार्ड क्र. ४४ परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी सामाजिक बांधिलकी जपत १० नवीन बेंचेसची स्थापना करण्यात आली. साईराज बिल्डर्सचे संचालक श्री महेश फगरे यांच्या पुढाकारातून ही बेंचेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
व्हॅक्सिन डेपो मैदान तसेच मंडोळी रोडवरील पदपथावर या बेंचेस बसविण्यात आल्या असून, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच परिसरातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे. सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आता बसण्यासाठी सोयीची व्यवस्था उपलब्ध झाली आहे.
या उपक्रमामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक आनंद चव्हाण, साईराज लॉन्सचे संचालक रोहित फगरे, वसंत हेब्बाळकर, राहुल कांबळे, सुनील मुतकेकर तसेच वार्ड क्र. ४४ आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
