मातीतील अस्सल हिरा! स्वप्निल सुतारची कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी

मातीतील अस्सल हिरा! स्वप्निल सुतारची कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी

म्हैसूर येथील स्पर्धेत ५५ किलो वजन गटात पटकावला तृतीय क्रमांक

बेळगाव : बेधडक बेळगाव वृत्तसेवा

म्हैसूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत सावगाव येथील युवा कुस्तीपटू पैलवान स्वप्निल कृष्णा सुतार याने उल्लेखनीय कामगिरी करत ५५ किलो वजन गटात तृतीय क्रमांक पटकावला. त्याच्या या यशामुळे सावगावसह परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

स्वप्निल सुतार हा २०१६ ते २०२० या कालावधीत खादरवाडी येथे शिक्षण घेत होता. याच काळात त्याने जय हनुमान तालीम, खादरवाडी येथे कुस्तीचे धडे गिरवले. मार्गदर्शक आणि वस्ताद मंडळींच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव करत त्याने मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

ग्रामीण भागातून पुढे येत कुस्तीच्या आखाड्यात आपले कौशल्य सिद्ध करणाऱ्या स्वप्निलच्या यशाचे कुस्तीप्रेमी आणि हितचिंतकांकडून कौतुक होत आहे. भविष्यात त्याने कुस्ती क्षेत्रात आणखी मोठे यश संपादन करावे आणि गावाचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा जय हनुमान तालीम, खादरवाडी येथील मार्गदर्शक आणि कुस्तीप्रेमींनी दिल्या आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − eleven =

error: Content is protected !!