कार्तिक पौर्णिमेनिमित्त कपिलेश्वर मंदिरात सोमवारी मध्यरात्रीपासून कार्तिक स्वामी दर्शनाची पर्वणी

कार्तिक पौर्णिमेनिमित्त कपिलेश्वर मंदिरात सोमवारी मध्यरात्रीपासून कार्तिक स्वामी दर्शनाची पर्वणी

महिलांसह सर्व भक्तांना वर्षातून एकदाच मिळणार दर्शनाची संधी; मंगळवारी रात्री ८.२३ वाजता महाआरतीने मंदिर बंद होणार

बेळगाव : कार्तिक पौर्णिमेनिमित्त बेळगाव येथील प्रसिद्ध श्री कपिलेश्वर मंदिरात कार्तिक स्वामी दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दिनांक २३ नोव्हेंबर रोजी उत्तररात्री २.१५ वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात होणार असून, मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८.२३ वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला कृतिका नक्षत्राचा योग जुळून आल्याने या दिवशी श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते. या विशेष दिवशी श्री कार्तिक स्वामींचा विधिवत अभिषेक करण्यात येणार असून, सर्व भाविकांना दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग वर्षातून केवळ एकदाच येत असल्याने भाविकांमध्ये या दर्शन सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. महिलांनीही या दुर्मिळ दर्शन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी रात्री ८.२३ वाजता विशेष महाआरती करण्यात येणार असून, त्यानंतर कार्तिक स्वामी मंदिर बंद करण्यात येईल. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी दिलेल्या वेळेची नोंद घेऊन सहकार्य करावे.

या धार्मिक सोहळ्यास सर्व भक्तांनी उपस्थित राहून श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे, असे आवाहन श्री कपिलेश्वर महादेव ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen + one =

error: Content is protected !!