साई स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे खानापूर तालुक्यातील उदयोन्मुख खेळाडूंना स्केटिंग, क्रिकेट व फुटबॉल प्रशिक्षण शिबिराला नुकतेच सुरू करण्यात आले, खानापूर तालुक्यातील उदयोन्मुख खेळाडूंना खेळात पुढे जाण्यासाठी साई स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे खानापूर येथील मराठा मंडळचे सिद्धिविनायक स्कूल येथील सुसच्च अश्या मैदानावर हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे हे शिबिर तज्ञ प्रशिक्षकच्या
मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार असून सर्व खेळाडूनी याचा लाभ घावा असे आवाहन करण्यात आले आहे. नुकतेच या सर्व मैदानाची प्रसाद जाधव व राजलक्ष्मी जाधव यांच्या शुभ हस्ते पूजा करून सुरुवात करण्यात आली यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, ऋषिकेश पसारे, साई स्पोर्ट्स अकॅडमी चे स्टाफ आणि खेळाडू व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
खानापूर तालुक्यात उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला सुरुवात
