श्री भगवती पद्मावती अम्मा यांच्या जन्मदिनानिमित्त श्री अष्टलक्ष्मी पूजा

श्री भगवती पद्मावती अम्मा यांच्या जन्मदिनानिमित्त श्री अष्टलक्ष्मी पूजा

बेळगाव : श्री भगवती पद्मावती अम्मा यांच्या जन्मदिनानिमित्त ‘प्रेमाचा दिवस’ म्हणून शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष श्री अष्टलक्ष्मी पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पूजा सायंकाळी ४ वाजता सदाशिव नगर, डबल रोड, बेळगाव येथील श्री परमज्योती अम्मा भगवान ध्यान मंदिरात होणार आहे.

या पवित्र पूजेमध्ये कलशात परमज्योती महालक्ष्मीचे आवाहन करून जीवनातील अष्ट ऐश्वर्य, सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य, ज्ञान, धैर्य, विजय, शक्ती, संतती आणि सौभाग्य यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.

पूजेदरम्यान श्री महालक्ष्मीच्या आठ स्वरूपांची विशेष आराधना केली जाणार आहे. आदी लक्ष्मीच्या माध्यमातून उत्तम आरोग्य, धान्य लक्ष्मीच्या कृपेने धान्यसमृद्धी, धैर्य लक्ष्मीच्या माध्यमातून धैर्य, गज लक्ष्मीच्या कृपेने शक्ती व सामर्थ्य, संतान लक्ष्मीच्या माध्यमातून संततीसुख, विजय लक्ष्मीच्या कृपेने विजय, विद्या लक्ष्मीच्या माध्यमातून ज्ञान व बुद्धिमत्ता आणि धन लक्ष्मीच्या कृपेने धन-समृद्धी प्राप्त व्हावी, यासाठी भक्तिभावाने प्रार्थना केली जाणार आहे.

या निमित्ताने भक्तांना अध्यात्मिक साधना, प्रार्थना तसेच परमज्योतीच्या उपासनेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

श्री भगवती पद्मावती अम्मा यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित या पवित्र अष्टलक्ष्मी पूजेत भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री महालक्ष्मीची दिव्य कृपा व आशीर्वाद प्राप्त करावेत, असे आवाहन श्री अम्मा भगवान सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 − five =

error: Content is protected !!