बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अभिवादन

बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अभिवादन

बेळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सीमा भाग बेळगाव यांच्या वतीने हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री मंगाई नगर येथील सोमेश्वरी हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि श्री मंगाई नगरमधील पंचांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना बंडू केरवाडकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या लढ्यात बाळासाहेबांनी उभी केलेली चळवळ आजही विसरता येणार नाही. त्यांच्या योगदानामुळेच सीमाप्रश्न आजतागायत जिवंत असून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या लढ्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला उपशहरप्रमुख प्रवीण तेजम, शहापूर प्रमुख अमर कडगावकर, मंगेश नागोजी, सहदेव रेमाना, सागर पाटील, श्रीधर बिरजे, बाळू भोसले, मंगेश पोटे, किशोर तळेकर, मंजू कडोलकर, महेश हसबे, रमेश कडोलकर, संतोष कडोलकर आणि गजानन अनवेकर यांच्यासह शिवसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 − ten =

error: Content is protected !!