बेळगाव : बेळगाव तालुका पेंडॉल अँड इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला स्नेह मिलन कार्यक्रम सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी ओल्ड पी. बी. रोड येथील साई भवन येथे उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार जगदीश शेट्टर, पालकमंत्री सतीश अण्णा जारकीहोळी यांच्यासह प्रशांत अगरवाल, सगरभाई चौव्हान, नारायण चौगुले, भाऊराव मन्नोळकर, महादेव मन्नोळकर, दामोदर रतन आणि परशराम साळुंखे उपस्थित होते.
या स्नेह मिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर एकत्र आले. या कार्यक्रमातून सदस्यांमध्ये स्नेहभाव व परस्पर संवाद वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बेळगाव तालुका पेंडॉल अँड इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स वेल्फेअर असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल आंबरोळे यांनी केले.
