विद्यार्थी जीवनाचा पाया भक्कम करण्यासाठी वेळेचा सदुपयोग करा : अनंत लाड

विद्यार्थी जीवनाचा पाया भक्कम करण्यासाठी वेळेचा सदुपयोग करा : अनंत लाड

बेळगाव : मानवी जीवनात विद्यार्थी जीवनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जीवनाचा पाया भक्कम करण्यासाठी वेळेचा सदुपयोग करा, चांगल्या मूल्यांची कास धरा आणि कठोर परिश्रमातून यश संपादन करा, असे मार्गदर्शन निवृत्त शिक्षक व सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष अनंत लाड यांनी केले.

ज्ञानदीप एज्युकेशन ट्रस्ट संचलित जी. जी. चिटणीस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. विमल लाड उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अॅड. चंद्रहास अनवेकर होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष सुधाकर देसाई, इमी राइट्सचे अध्यक्ष प्रा. व्ही. एन. जोशी आणि प्राचार्य डॉ. नवीन शेट्टीगार उपस्थित होते.

प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ. नवीन शेट्टीगार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी अॅड. चंद्रहास अनवेकर आणि डॉ. नवीन शेट्टीगार यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. विविध ठिकाणी आयोजित स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सौ. विमल लाड यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अनंत लाड यांनी विद्यार्थी जीवनाचा आनंद घेतानाच अभ्यास, वेळेचे नियोजन आणि मेहनतीला महत्त्व देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केल्यास अपेक्षित यश नक्कीच मिळवता येते, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अनेक थोर आणि यशस्वी व्यक्तींच्या जीवनातील प्रेरणादायी उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर मांडली.

याप्रसंगी आसिफा तोंडी खान आणि सौ. इनशानाज सानुवाले यांनीही मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष सुधाकर देसाई यांनी विचार मांडले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले.

निशा दोडमणी यांनी आभार मानले, तर भूमी लटकन आणि दिशा दोडमणी यांनी सूत्रसंचालन केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five − one =

error: Content is protected !!