ज्ञान, मनोरंजन आणि आरोग्य जनजागृतीचा सुरेल संगम; ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्रात विविध कार्यक्रम उत्साहात

ज्ञान, मनोरंजन आणि आरोग्य जनजागृतीचा सुरेल संगम; ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्रात विविध कार्यक्रम उत्साहात

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटरमध्ये ज्ञान आणि मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. व्यासपीठावर कार्यवाह सुरेंद्र देसाई, उपाध्यक्ष के. एल. मजूकर आणि सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सोसायटीचे आजीव सभासद स्वर्गीय शशिकांत सडेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी अशोक लोकूर यांनी ‘ओमकार व शीतलीकरण’ या विषयावर मार्गदर्शन करत ओमकाराचे आध्यात्मिक व आरोग्यदायी महत्त्व विशद केले. मीना कुलकर्णी यांनी प्रार्थना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

यानंतर रविंद्रनाथ व स्नेहलता जुवळी, अश्विनी पाटील, नारायण कोरडे, डॉ. श्रेयस चौगुले, सुरेंद्र व योगिनी देसाई, उल्हास पानसे, अशोक कदम आणि विजय वाईगडे यांनी मराठी, हिंदी व कन्नड गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विजय बांदिवडेकर यांनी सादर केलेल्या अभंगाने उपस्थितांना वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक आनंद अनुभवायला मिळाला.

वनिता जोशी यांनी आकर्षक नृत्य सादर केले, तर अरविंद मुतकेकर यांनी विनोदी चुटक्यांनी उपस्थितांची खळखळून करमणूक केली. विठ्ठल पोलो यांनी एसआयआर (SIR) फॉर्मबाबत मार्गदर्शन करून आवश्यक माहिती दिली.

कार्यक्रमाचा समारोप के. एल. मजूकर यांनी उपस्थितांचे आभार मानून केला. ज्ञान, आरोग्य, अध्यात्म आणि मनोरंजनाचा सुंदर संगम घडविणाऱ्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three + 11 =

error: Content is protected !!