क्रीडा ज्ञान परीक्षा व राष्ट्रीय क्रीडा नीतीवर मार्गदर्शन; क्रीडा क्षेत्रासाठी व्यापक उपक्रम राबविणार – प्रसाद महानकर

क्रीडा ज्ञान परीक्षा व राष्ट्रीय क्रीडा नीतीवर मार्गदर्शन; क्रीडा क्षेत्रासाठी व्यापक उपक्रम राबविणार – प्रसाद महानकर

बेळगाव, ता. १३ : शास्त्रीनगर येथील विमल फाउंडेशनच्या कार्यालयात क्रीडा भारती बेळगावच्या पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत क्रीडा भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री प्रसाद महानकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आगामी ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या क्रीडाज्ञान परीक्षा तसेच राष्ट्रीय क्रीडा नीती या विषयांवर सविस्तर चर्चा केली.

यावेळी बोलताना प्रसाद महानकर म्हणाले की, देशातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी क्रीडा भारती सातत्याने कार्यरत असून स्पोर्ट्स पॉलिसी, एज्युकेशन पॉलिसी, टॅलेंट हंट, खेल आंदोलन आणि खेल नीती या विषयांवर संघटना विविध स्तरांवर काम करत आहे. आगामी काळात खेळाडू आणि विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीपूर्वी क्रीडा भारती बेळगावच्या वतीने जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी लक्ष्मण पवार, किरण जाधव, अशोक शिंत्रे, प्रांताध्यक्ष व अर्जुन पुरस्कार विजेते मुष्टियोद्धा मुकुंद किल्लेकर, उपाध्यक्ष ॲड. सुधीर धामणकर आणि कोषाध्यक्ष परशुराम मंगणाईक यांच्या हस्ते प्रसाद महानकर यांचा सत्कार करण्यात आला.

बैठकीला राष्ट्रीय ज्युडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील, संजीव नाईक, एन. एन. काटकर, क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, उमेश बेळगुंदकर, मयुरी पिंगट, ऐश्वर्या नेसरकर, शुभांगी काकतकर, नकोशा मंगणाकर, सुरज पाटील, संजू नाईक तसेच क्रीडा भारतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बेळगाव जिल्ह्यातून आगामी क्रीडाज्ञान परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि खेळाडूंनी सहभागी व्हावे, यासाठी व्यापक जनजागृती करून प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन क्रीडा भारती बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसाद महानकर यांना दिले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × two =

error: Content is protected !!