अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते अरविंदराव देशपांडे हे कचरा विल्हेवाट लावणाऱ्या मिनी ट्रकच्या धडकेतून थोडक्यात बचावले.
देशपांडे हे कारच्या शेजारी उभे असताना अचानक कचरा वाहतूक करणारे वाहन त्यांच्या दिशेने आले आणि त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली. प्रसंगावधान राखत देशपांडे यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्यांना तत्काळ बाजूला ओढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली असून, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.
कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक दारूच्या नशेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
घटनेबाबत अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे.
