बेळगाव: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ भाजप नेते किरण जाधव यांच्या हस्ते बालकांना पल्स पोलिओचे दोन थेंब पाजून करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओ लसीचे दोन थेंब देऊन या राष्ट्रीय मोहिमेला यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिओ निर्मूलन मोहिमेत प्रत्येक पालकाने सहभागी होणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेद्वारे देशाला पोलिओमुक्त ठेवण्याच्या उद्दिष्टाला बळकटी मिळणार असून, प्रत्येक पात्र बालकापर्यंत लसीकरण पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले आहे.
