ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

बेळगाव, दि. २७ : ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशभक्ती, शिस्त आणि शिवप्रेमाने भारलेल्या वातावरणात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक उपक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. स्वप्नील वाके आणि मुख्याध्यापिका श्रीमती प्रेमलता पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मुख्याध्यापिका व शिक्षकवृंदाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर विधिवत अभिषेक केला. मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे महाराजांची आरती करून अभिवादन केले.

यावेळी इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी शिस्त, धैर्य आणि युद्धकलेचे दर्शन घडवणारे आकर्षक लाठी-काठी प्रात्यक्षिक सादर केले. तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचे वर्णन करणारे प्रेरणादायी पोवाडे सादर करून उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला.

इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी “शिवाजी महाराज पाळणा” या गीतावर सादर केलेल्या पारंपरिक नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली. यानंतर विद्यार्थ्यांनी दिलेल्या ‘शिवगर्जने’ने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

मार्गदर्शन करताना CEO श्री. स्वप्नील वाके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श, नेतृत्वगुण, शिस्त, धैर्य आणि राष्ट्रप्रेम यांचा विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकार करावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सायली आस्तेकर यांनी केले, तर श्री. प्रभा रायकर यांनी आभार प्रदर्शन केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने श्री. प्रतीक आपटेकर आणि श्री. कृष्णा अनसुरकर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व समन्वय साधला.

या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रेरणादायी वारसा समजून घेण्याची संधी मिळाली. जबाबदार, सुसंस्कृत आणि देशभक्त नागरिक घडविण्याच्या शाळेच्या ध्येयाचा पुनरुच्चार या कार्यक्रमातून करण्यात आला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 − three =

error: Content is protected !!