मिशन ऑलिंपिक गेम असोसिएशन कर्नाटक राज्याची बैठक संपन्न; राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाची घोषणा

मिशन ऑलिंपिक गेम असोसिएशन कर्नाटक राज्याची बैठक संपन्न; राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाची घोषणा

बेळगाव : मिशन ऑलिंपिक गेम असोसिएशन कर्नाटक राज्यच्या वतीने शनिवारी अंजनेय नगर येथील बास जिम व्यायामशाळेत संघटनेची बैठक उत्साहात पार पडली. बैठकीला संघटनेचे कर्नाटक राज्याध्यक्ष पै. अतुल शिरोळे प्रमुख उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी उपाध्यक्ष महेश गुंजीकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. तसेच एम. गंगाधर यांची बैठकीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी चेतन देसाई यांनी संघटनेच्या वार्षिक कामकाजाचा आढावा सादर केला. आगामी वर्षात संघटनेच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या वर्षभरात कर्नाटकभर राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बेळगावसह राज्यातील विविध खेळांतील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना राज्याध्यक्ष पै. अतुल शिरोळे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत उद्दिष्टे स्पष्ट केली. मागील वर्षी यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे कौतुक करत पदाधिकारी, सदस्य व देणगीदारांचे आभार मानले. आगामी स्पर्धा अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

बैठकीस कर्नाटक राज्याध्यक्ष पै. अतुल शिरोळे, उपाध्यक्ष महेश गुंजीकर, सचिव नागेश सुतार, कार्याध्यक्ष एम. गंगाधर, खजिनदार भावेश बिर्जे, उपखजिनदार चेतन देसाई, महिला प्रमुख शाहीन डी., विद्या पाटील, रेश्मा चौगुले तसेच सदस्य कृष्णा जाधव, विजय तीप्पानाचे, दुंडेश नाईक, महेश पाटील, रामदास मुलेरखी, राहुल शिवंगेकर आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 + 12 =

error: Content is protected !!