मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालानिमित्त शिक्षक व विद्यार्थ्यांचा मातोश्री सौहार्द सोसायटीकडून सत्कार

मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालानिमित्त शिक्षक व विद्यार्थ्यांचा मातोश्री सौहार्द सोसायटीकडून सत्कार

बातमी:
मण्णूर येथे मातोश्री सौहार्द सोसायटीच्या वतीने कलमेश्वर हायस्कूलच्या दहावीच्या 100 टक्के निकालानिमित्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. भरत चौगुले यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करत सोसायटीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कु. कामिनी सोमनाथ कदम (88.8%) यांना 1000 रुपये व स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांकाच्या कु. संपूर्णा लक्ष्मण काकतकर (83.2%) यांना 700 रुपये व स्मृतिचिन्ह, तर तृतीय क्रमांकाच्या कु. सर्वस्वी बाळू काकतकर (81.7%) यांना 500 रुपये व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन श्री. आर. एम. चौगुले यांनी शुभेच्छापर भाषण करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच सोसायटीने विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेत आर्थिक व्यवहारांची माहितीही दिली.

यावेळी उपाध्यक्ष सागर कटगेन्नावर, संचालक नारायण नाईक, शंकर सांबरेकर, सोमनाथ कांबळे, तसेच सल्लागार नारायण कालकुंद्री, नागेश चौगुले, नितीन कदम, मलाप्पा चौगुले, संदीप डोनकर, महेश चौगुले, पालक सोमनाथ कदम, सौ. माधुरी कदम, सौ. रेखा लक्ष्मण कातकर, सौ. शोभा बाळू काकतकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमास शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भरमा चौगुले यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − 12 =

error: Content is protected !!