बंबरगा परिसरात पाण्यात पडलेल्या युवकाचा मृतदेह २ तासांत शोधला; HERF टीमची तत्पर कारवाई

बंबरगा परिसरात पाण्यात पडलेल्या युवकाचा मृतदेह २ तासांत शोधला; HERF टीमची तत्पर कारवाई

बातमी:
आज दि. 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास बंबरगा गाव परिसरात करगुपी येथील रहिवासी बसवराज मारुती माळगी (वय 34) हे पाण्यात पडल्याची माहिती स्थानिक पोलिसांकडून प्राप्त झाली.

माहिती मिळताच Helpline Emergency Rescue Foundation (HERF) ची टीम तात्काळ बोटीसह घटनास्थळी दाखल झाली. अत्यंत वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने शोधकार्य सुरू करत अवघ्या दोन तासांत संबंधित व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात टीमला यश आले.

या शोध व बचाव कार्यात बसवराज हिरेमठ, सुरज राक्षे, कार्तिक पाटील आणि प्रकाश पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला. मृतदेह लवकर मिळाल्यामुळे पुढील कायदेशीर प्रक्रिया सुलभ झाली असून स्थानिक प्रशासनाने HERF टीमच्या कार्याचे कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 2 =

error: Content is protected !!