बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान, अनगोळ यांच्या वतीने आयोजित “बेळगाव हिंदकेसरी” पर्व तिसरे बैलगाडा शर्यतीचा उद्घाटन सोहळा आज दि. २४ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास अनगोळ परिसरातील शेतकरी बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी मरगाई मंदिर येथे विधिवत पूजेनिशी करण्यात आली. त्यानंतर गावातील कलमेश्वर मंदिर, गणपती मंदिर, मारुती मंदिर, भैरीदेव मंदिर, रामलिंग मंदिर, चव्हाटा मंदिर, महालक्ष्मी मंदिर तसेच सदानंद महाराज मठ येथे मिरवणुकीद्वारे पूजन करण्यात आले.
यानंतर मरगाई मंदिर समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव येथे श्रीराम सेना हिंदुस्थानचे अनगोळ विभाग प्रमुख उमेश कुऱ्याळकर तसेच उपस्थित शेतकरी बांधवांच्या हस्ते बैलगाड्यांचे पूजन करण्यात आले आणि शर्यतीला सुरुवात करण्यात आली.

या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून यल्लाप्पा देमजी, गणपत साळुंखे, अरुण बेर्डे, प्रवीण कदम, नारायण शिंदोळकर, बाळू देवण, महावीर हणमण्णावर, शंकर जाधव, मल्लाप्पा होळकर, संजीव कडेमणी, जितेंद्र गुंडप्पणावर, बाबू सोमनाचे, रामा सोमनाचे, मुर्तीकार विजय सिमु, महादेव सोमणाचे, जोतिबा लाटुकर, रवी येळूरकर, महेश गौंडाडकर, फकीरा सोमनाचे, बाबुराव धामणेकर, आप्पाजी धामणेकर, नेमिनाथ हणमण्णावर, मोनाप्पा सोमनाचे, संभाजी जाधव, बंडू हसबे, भोला कोलकार, रघु जाधव, मल्लाप्पा सांबरेकर, मोहन बडमंजी, गोपाळ सोमणाचे, विजय झिंगरूचे, हरि शिंदोळकर, शंकर सावंत, राजू चौगुले आदी मान्यवर तसेच गावातील पंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
