निपाणीतील मूलभूत प्रश्नांसाठी १५ जुलैला धरणे आंदोलन; 4 जेआर ह्युमन राईटस् केअर ऑर्गनायझेशनकडून प्रशासनाला निवेदन

निपाणीतील मूलभूत प्रश्नांसाठी १५ जुलैला धरणे आंदोलन; 4 जेआर ह्युमन राईटस् केअर ऑर्गनायझेशनकडून प्रशासनाला निवेदन

तहसीलदार, सीपीआय, पीएसआय आणि कमिशनर यांना आंदोलनाची पूर्वसूचना; नागरिक व सामाजिक संघटनांना सहभागी होण्याचे आवाहन:

निपाणी (प्रतिनिधी): निपाणी शहर व परिसरातील गंभीर आणि मूलभूत नागरी समस्यांकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने अपेक्षित दखल न घेतल्याच्या निषेधार्थ 4 जेआर ह्युमन राईटस् केअर ऑर्गनायझेशनच्या वतीने १५ जुलै २०२६ रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मा. तहसीलदार, मा. सीपीआय, मा. पीएसआय तसेच कमिशनर यांना निवेदन सादर केले.

यावेळी प्रख्यात विचारवंत मा. प्रा. डॉ. अच्युत माने यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निपाणी शहरातील पाणीपुरवठा, नागरी सुविधा, मूलभूत विकासकामे आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित असून, त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे आंदोलन कोणत्याही एका व्यक्तीचे किंवा एका संघटनेचे नसून, निपाणीतील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांसाठी आणि मूलभूत गरजांसाठीचा लढा असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे धरणे आंदोलन बुधवार, १५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता निपाणी तहसीलदार कार्यालयासमोर सुरू होणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 2 =

error: Content is protected !!