राऊडी शिटर–पोलीस युतीच्या आरोपावरून ब्लॉक काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन

राऊडी शिटर–पोलीस युतीच्या आरोपावरून ब्लॉक काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन

खानापूर : खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसतर्फे राऊडी शिटर आणि पोलीस यांच्यात अभद्र युती झाल्याचा आरोप करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तालुक्यात कायद्याचे पालन होत नसून राऊडी शिटरचे “ग्लोरीफिकेशन” होत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.

ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ॲड. घाडी यांनी समाजाने प्रबोधनासाठी विचारवंत, शिक्षक आणि समाजप्रबोधनकारांना पुढे आणावे, राऊडी शिटरांना नव्हे, असे स्पष्ट मत व्यक्त केले. तसेच पोलीस प्रशासनाची भूमिका चुकीची असून संविधानाच्या मूल्यांचा अवमान होत असल्याचा घणाघात करण्यात आला.

यावेळी मानतेश राऊत आणि लक्ष्मण मादार यांनीही पोलीस प्रशासनावर टीका करत तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. तहसीलदारांनी दंडाधिकारी म्हणून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास हा मुद्दा गृहमंत्र्यांपर्यंत नेऊन पाठपुरावा करण्याचा इशारा ब्लॉक काँग्रेसने दिला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen + one =

error: Content is protected !!