बेळगाव : फिट इंडिया अॅम्बेसेडर व राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते रणजितसिंग राजपूत यांनी आज शांताई वृद्धाश्रमाला भेट देत येथील ज्येष्ठ नागरिकांसोबत मनमोकळा वेळ घालवला.
या भेटीदरम्यान त्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची उत्तम तब्येत, सक्रिय जीवनशैली आणि स्वच्छ, शांत वातावरण पाहून समाधान व्यक्त केले. तसेच या संस्थेचे सुयोग्य व्यवस्थापन आणि सेवाभावाचे त्यांनी कौतुक केले.
माजी महापौर विजय मोरे व त्यांच्या कुटुंबीयांनी वृद्धाश्रम उभारणी व देखभालीसाठी घेतलेल्या परिश्रमांचेही राजपूत यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी शांताई वृद्धाश्रमचे संचालक अॅलन विजय मोरे यांनी रणजितसिंग राजपूत यांचा शाल, पुस्तक व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. प्रदीप पुनेकर व विजय मोरे यांनीही राजपूत यांचे आभार मानले.
ही भेट प्रेरणादायी ठरली असून ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवून कार्यक्रमाचा समारोप झाला.
