बापट गल्लीतील श्री कालिकादेवी युवक मंडळाची बैठक उत्साहात संपन्न; शिवजयंती नियोजनाला वेग

बापट गल्लीतील श्री कालिकादेवी युवक मंडळाची बैठक उत्साहात संपन्न; शिवजयंती नियोजनाला वेग

बेळगाव : आगामी पारंपारिक श्री शिवजयंती उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्री कालिकादेवी युवक मंडळ, बापट गल्ली यांची बैठक मंगळवार दिनांक ७ रोजी उत्साहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी धनंजय कणबरकर होते.

यावेळी १९ एप्रिल रोजी शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात तसेच २१ एप्रिल रोजी होणाऱ्या चित्ररथ देखाव्याच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, यंदाच्या चित्ररथ देखाव्याचा विषय काय असावा याबाबत सर्वसंमतीने निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, बापट गल्लीतील युवा कार्यकर्ते व मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश अरविंद केसरकर यांची नुकतीच मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. गल्लीतील ज्येष्ठ पंच गोपाळराव केसरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

या निवडीमुळे गल्लीचा मान उंचावला असल्याचे सांगत उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. मात्र, या निवडीबाबत मुद्दाम संभ्रम निर्माण करणाऱ्या एका जुन्या कार्यकर्त्याचा बैठकीत सर्वानुमते तीव्र निषेध नोंदविण्यात आला. तसेच आगामी काळात अंकुश केसरकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस सुनील केसरकर, महेश पावले, सुनील मुरकुटे, भाऊ किल्लेकर, दिगंबर किल्लेकर, अतुल केसरकर, गजानन निलजकर, शुभम मोरे, अमर खनगावकर, अभिषेक निलजकर, नरू निलजकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, ज्येष्ठ पंचमंडळी, महिला वर्ग व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − fifteen =

error: Content is protected !!