PSAच्या जलतरणपटूंची दमदार कामगिरी; यश पाटुकलेचे ४ सुवर्णपदकांसह विजेतेपद

PSAच्या जलतरणपटूंची दमदार कामगिरी; यश पाटुकलेचे ४ सुवर्णपदकांसह विजेतेपद

इचलकरंजी येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत पॅशनेट स्पोर्ट्स अकॅडमी (PSA)च्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पुन्हा एकदा आपली छाप पाडली. अवघ्या ६ वर्षांच्या यश पाटुकलेने ४ सुवर्णपदके पटकावत चॅम्पियनशिप ट्रॉफीवर नाव कोरले. लहान वयातच सर्व स्ट्रोक्सवर प्रभुत्व मिळवत त्याने जलतरणात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

तसेच निराली हिंगमेरी हिने ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात कांस्यपदक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. तिच्या या यशातून तिची मेहनत आणि स्पर्धात्मक वृत्ती अधोरेखित झाली.

PSAमध्ये केवळ पदकांवर नव्हे तर खेळाडूंच्या भक्कम पायाभरणीवर भर दिला जातो. याच मजबूत पायाभरणीमुळे अकॅडमीतील अनेक जलतरणपटू पुढील उच्च स्तरावर प्रगती करत देशभरातील विविध अकॅडमींमध्ये संधी मिळवत आहेत.

सर्व विजेत्या खेळाडूंचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 − one =

error: Content is protected !!