गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त जीवनविद्या मिशनतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त जीवनविद्या मिशनतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

बेळगांव : जीवनविद्या मिशन, ज्ञानसाधना केंद्र बेळगांव यांच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव २०२६ व कृतज्ञता दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १.३० या वेळेत मराठा मंदिर, रेल्वे ओव्हरब्रिजजवळ, गोवावेस, बेळगांव येथे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाची सुरुवात हरिपाठाने होणार असून त्यानंतर संगीत जीवनविद्या, बाल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांचे नृत्य व गायन, गुरुपूजन, मानसपूजा, सत्कार, अनमोल प्रबोधन, अनुग्रह तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

या महोत्सवात आदरणीय श्री. प्रल्हाद वामनराव पै (मुंबई) हे “कृतज्ञता हीच खरी उपासना” या विषयावर दुपारी १२ ते १.३० या वेळेत मार्गदर्शन करणार आहेत.

जीवनविद्या मिशनतर्फे बेळगांव व परिसरातील नागरिकांनी आपल्या कुटुंबीय व मित्रपरिवारासह उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून सर्वांचे स्वागत करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two + fourteen =

error: Content is protected !!