खुल्या राष्ट्रीय रँकिंग स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या शुभम साखेची कांस्यपदकाची चमकदार कामगिरी

खुल्या राष्ट्रीय रँकिंग स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या शुभम साखेची कांस्यपदकाची चमकदार कामगिरी

बेळगाव : चंदीगड येथे आयोजित करण्यात आलेल्या खुल्या राष्ट्रीय रँकिंग रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर शुभम साखे याने उल्लेखनीय कामगिरी करत डाउनहिल प्रकारात कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत देशभरातील २०० हून अधिक स्केटर्सनी सहभाग घेतला होता.

शुभमच्या या यशामुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

शुभम साखे हा प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गंगणे आणि सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहे.

त्याच्या या यशामागे डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर तसेच कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव इंदुधर सीताराम यांचे प्रोत्साहन लाभल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे शुभम साखेने बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four + 13 =

error: Content is protected !!