होन्नीहाळमध्ये केएचबीचा गृहनिर्माण प्रकल्प; सुरुवातीलाच स्थानिकांचा विरोध

होन्नीहाळमध्ये केएचबीचा गृहनिर्माण प्रकल्प; सुरुवातीलाच स्थानिकांचा विरोध

बेळगाव: होन्नीहाळ गावात कर्नाटक गृहनिर्माण खाते(KHB) कडून प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पाला सुरुवातीपासूनच अडथळे निर्माण झाले आहेत. 92 एकर 7 गुंठे क्षेत्रावर निवासी वसाहत उभारण्याचा प्रस्ताव असून हा परिसर शहरापासून सुमारे 18 किमी अंतरावर आहे. सर्वे क्रमांक 43/1 ते 43/6 मध्ये हा प्रकल्प विकसित करण्याची योजना आहे.

मात्र, नियोजित जागेत मंदिर असल्याचे सांगत सुमारे 20 स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. मंदिराचे धार्मिक महत्त्व आणि स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन प्रकल्पाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकल्पामुळे परिसरातील जमीन व्यवहार आणि रिअल इस्टेट व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो, अशीही चर्चा आहे. काही जण हेतुपुरस्सर विरोध निर्माण करत असल्याचा आरोपही होत आहे.

याबाबत स्थानिक रहिवासी रघुराम पवार आणि आदर्श हिरेमठ यांनी सांगितले की, “होन्नीहाळ केएचबी प्रकल्प राबवला गेला तर परवडणारी घरे उपलब्ध होतील तसेच शहराचा विस्तार होण्यास मदत होईल. रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या पायाभूत सुविधांनाही चालना मिळेल. मात्र, सध्या सुरू असलेल्या विरोधामुळे प्रकल्पाला तात्पुरता विलंब होण्याची शक्यता आहे.”

तसेच जमीन संपादन प्रक्रियेबाबत चुकीची माहिती पसरवणे, जमीनमालकांमध्ये भीती निर्माण करणे आणि मोबदल्याबाबत संभ्रम निर्माण होण्याच्या घटनांमुळेही परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. सरकारी मंजुरी, जमीन संपादन आणि सार्वजनिक सुनावणी या टप्प्यांमध्ये पारदर्शकता राखल्यास हा गोंधळ दूर होऊ शकतो, असे मत व्यक्त करण्यात आले.

यासंदर्भात संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी नागरिकांना स्पष्ट माहिती देऊन प्रकल्प राबवावा, अशी मागणी पुढे येत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 − 6 =

error: Content is protected !!