डॉ. अंजली निंबाळकर यांची एआयसीसी सचिवपदी फेरनिवड; गोवा, दिव-दमण आणि दादरा-नगर हवेलीची पुन्हा जबाबदारी

डॉ. अंजली निंबाळकर यांची एआयसीसी सचिवपदी फेरनिवड; गोवा, दिव-दमण आणि दादरा-नगर हवेलीची पुन्हा जबाबदारी

खानापूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) सचिवांची नवी यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची सचिवपदी पुन्हा फेरनिवड करण्यात आली आहे. तसेच गोवा, दिव-दमण आणि दादरा-नगर हवेली या प्रदेशांची जबाबदारी पुन्हा एकदा त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

पक्षाने नव्या यादीत जवळपास २५ सचिवांना जबाबदारीतून मुक्त केले असताना डॉ. अंजली निंबाळकर यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत त्यांची सचिवपदी नियुक्ती कायम ठेवली आहे. पक्षासाठी त्यांनी आजवर केलेले प्रामाणिक काम, संघटनात्मक योगदान आणि पक्षनिष्ठा यांची ही पावती असल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

पक्षाकडून मिळालेली कोणतीही जबाबदारी १०० टक्के समर्पणाने पार पाडणे, हे डॉ. अंजली निंबाळकर यांचे वैशिष्ट्य राहिले आहे. दिवस-रात्र, सण-वार यांचा विचार न करता पक्षकार्याला प्राधान्य देत त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. पदे येतात आणि जातात; मात्र पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणे आणि आपली विचारधारा जपणे महत्त्वाचे आहे, ही भूमिका त्यांनी नेहमीच जपली आहे.

राजकारणात संयम आणि निष्ठा या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असून, डॉ. अंजली निंबाळकर यांनी आपल्या कार्यातून त्याचे उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या कामाची दखल पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडूनही घेतली जात असून, आगामी काळात त्यांच्यावर आणखी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या जातील, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

डॉ. अंजली निंबाळकर यांच्या फेरनिवडीबद्दल खानापूर तालुक्यातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × two =

error: Content is protected !!