बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवासेनेचा गोसेवेचा उपक्रम

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवासेनेचा गोसेवेचा उपक्रम

वाघवडे येथील सिद्धेश्वर गोशाळेला चारा, हरभरा भुस्सा आणि गुळाचे वाटप

बेळगाव : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवासेना (शिवसेना), बेळगावच्या वतीने गोसेवेचा उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्त युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाघवडे येथील सिद्धेश्वर गोशाळेला भेट देऊन गोमातेच्या सेवेसाठी आवश्यक खाद्यसामग्री भेट दिली.

यावेळी गोशाळेला ५० किलो पेंढा, २० किलो हरभरा भुस्सा आणि गुळाच्या दोन ढेपा देण्यात आल्या. गोमातेची सेवा हीच खरी समाजसेवा या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात युवासेनेचे पदाधिकारी विनायक हुलजी, वैभव कामत, उमेश पाटील, अद्वैत चव्हाण पाटील, ओंकार बैलरकर, विनायक पाटील, प्रणव जणगौडा, विद्येश बडसकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोसेवेच्या माध्यमातून युवासेना, बेळगावच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 3 =

error: Content is protected !!