हिंडलग्या कारागृहात कैद्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

हिंडलग्या कारागृहात कैद्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

बेळगाव : हिंडलग्या कारागृहातील सर्व कैद्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

केएलई रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पथकाने कारागृहाला भेट देऊन कैद्यांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी केली. तपासणीनंतर उपचाराची आवश्यकता असलेल्या कैद्यांना आवश्यक औषधेही देण्यात आली.

या आरोग्य उपक्रमासाठी जेएनएमसी चॅरिटेबल हॉस्पिटलचे प्राचार्य डॉ. राजेश पवार, आर. एस. मुधोळ तसेच डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) डॉ. आय. पी. गडद आणि माजी महापौर विजय मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कारागृहाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सरस्वती, केएलई चॅरिटेबल हॉस्पिटलचे पीआरओ बसवराज, हिंडलग्या कारागृहातील अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कैद्यांच्या आरोग्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचारी आणि कारागृह प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांचे आयोजकांनी कौतुक केले. कारागृहातील कैद्यांना आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध यंत्रणांनी एकत्रितपणे केलेला हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two + eleven =

error: Content is protected !!