कॅपिटल वन संस्थेला २१.६५ लाखांचा विक्रमी नफा; सभासदांना ८ टक्के लाभांश जाहीर

कॅपिटल वन संस्थेला २१.६५ लाखांचा विक्रमी नफा; सभासदांना ८ टक्के लाभांश जाहीर

बेळगाव : कॅपिटल वन संस्थेची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री सत्यविनायक मंदिर, छत्रेवाडा अनुसरकर गल्ली येथे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव हंडे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेला संस्थेचे बहुसंख्य सभासद उपस्थित होते.

३१ मार्च २०२६ अखेर संस्थेने सुमारे २३ कोटी ६४ लाख रुपयांच्या ठेवी, २७ कोटी ९२ लाख रुपयांचे खेळते भांडवल आणि १२४ कोटी ४५ लाख रुपयांची वार्षिक उलाढाल नोंदवली आहे. संस्थेला या आर्थिक वर्षात २१ लाख ६५ हजार ७९५ रुपये ६६ पैसे इतका विक्रमी नफा झाला असून, सभासदांना ८ टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली.

संस्था स्थापनेपासूनच सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत असून, एकांकिका स्पर्धा तसेच एसएसएलसी व्याख्यानमाला यांचे सातत्याने आयोजन केले जाते.

सभेच्या प्रारंभी चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी प्रास्ताविक व स्वागत करून सभेच्या कामकाजास सुरुवात केली. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून त्यांचे विवेचन करण्यात आले. सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली.

संचालक शरद पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. अहवाल वर्षात वसुलीसाठी विशेष परिश्रम घेतलेल्या अमित कल्लीमनी आणि प्रशांत दळवी यांचा शाम सुतार व शिवाजीराव अतिवाडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी संचालक संजय चौगुले, रामकुमार जोशी, लक्ष्मीकांत जाधव, नंदा कांबळे, भाग्यश्री जाधव यांच्यासह संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व पिग्मी संकलक उपस्थित होते.

सेक्रेटरी स्नेहल कंग्राळकर यांच्या आभार प्रदर्शनाने सभेची सांगता झाली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × five =

error: Content is protected !!