दि. 07/04/2026 रोजी कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
लिंगराज कॉलेज कॅम्पसमधील BBA स्टाफ रूममध्ये अज्ञात व्यक्तीने लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, रोख रक्कम, बँक पासबुक आणि महत्त्वाचे शैक्षणिक कागदपत्रे असा मुद्देमाल चोरी केल्याची तक्रार दाखल झाली होती.
या प्रकरणाचा तपास करताना विशेष पथकाने अब्दुसुफियान अब्दुलअजीज खोतावाले (वय 20) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लॅपटॉप, 3 पेन ड्राईव्ह, ₹1500 रोख, 2 बँक पासबुक, 25 उत्तरपत्रिका व डायरी असा एकूण ₹25,500 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
#Belgav #BedhadakBelgav
