हमारा देश संघटनेचे डीसीपींना निवेदन; बेकायदेशीर घुसखोरीविरोधात कारवाईची मागणी

हमारा देश संघटनेचे डीसीपींना निवेदन; बेकायदेशीर घुसखोरीविरोधात कारवाईची मागणी

बेळगाव : हमारा देश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पोलीस उपायुक्त श्री. नारायण बर्माणी यांची भेट घेऊन बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाईबाबत निवेदन सादर केले.

बंगळुरू पोलिसांनी अलीकडेच केलेल्या कारवाईचे संघटनेने कौतुक करत, बेळगाव व कर्नाटकातील इतर भागातही अशाच प्रकारचे कायदेशीर तपास आणि पडताळणी मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली. समाजात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ही पावले आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

ही भेट सकारात्मक वातावरणात पार पडली असून, जबाबदार नागरिक म्हणून संघटनेने आपली भूमिका मांडत कायदेशीर आणि शांततामय उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली. 🙏

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve − four =

error: Content is protected !!