बेळगाव : पारंपारिक शिवजयंती उत्सवाच्या १०७ वर्षांच्या परंपरेनिमित्त शहापूर येथील गाडेमार्ग बिचू गल्लीमध्ये शिवकालीन युद्धकलेचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. धर्मवीर श्री संभाजी युवक मंडळ व श्री शिवनेरी युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात शिवसंस्कृतीचा वारसा आणि इतिहासातील पराक्रम जिवंत करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय बैलूरकर होते, तर उद्घाटक म्हणून बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये माजी नगरसेवक नेताजी जाधव, विकास कलघटगी, शुभम शेळके, धनंजय पाटील, मोतेश बारदेशकर, अहमद रेशमी, नगरसेवक जयंत जाधव, पत्रकार श्रीकांत काकतीकर, विश्वनाथ येळ्ळूरकर, पियुष हावळ, विनायक हुलजी आदी मान्यवरांचा समावेश होता.
कार्यक्रमात पारंपरिक शस्त्रकला, मर्दानी खेळ आणि शिवकालीन पराक्रमांचे थरारक सादरीकरण करण्यात आले. वस्ताद आनंद ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या या प्रात्यक्षिकांनी उपस्थित शिवप्रेमींना मंत्रमुग्ध केले. मिलिंद सावंत यांच्या आवाजातील शिवपोवाड्यांनी वातावरण भारावून गेले. किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेल्या युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी विशेष दाद मिळवली, तर पाच वर्षांच्या जिजा किरण जाधव या बालिकेच्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमातून शिवसंस्कार आणि समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ शेकडो शिवभक्तांनी घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख सल्लागार अशोक घगवे, सुरज जाधव, निलेश काकतकर, अध्यक्ष सचिन धाडवे, सचिव विशाल साव
